ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शाळा वाचवण्यासाठी शिक्षक भारती व छात्र भारती घेणार पुढाकार ; गावोगावी शाळा व्यवस्थापन समितीचे ठराव करणार.

शाळा वाचवण्यासाठी शिक्षक भारती व छात्र भारती घेणार पुढाकार ; गावोगावी शाळा व्यवस्थापन समितीचे ठराव करणार.

प्रकाशन: 11 Oct 2022 10:38 AM
वाचन संख्या 48

जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांची माहिती .

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : ग्रामीण भागातील शाळा टिकाव्यात, ग्रामीण भागातील वाडीवस्तीतील मुले शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकली जाऊ नयेत. म्हणून आपल्या गावातील शाळा वाचवण्यासाठी शिक्षक भारती व छात्र भारतीने राज्यभरातून पुढाकार घेतला आहे.
प्रशासन पातळीवर कमी पट संखेच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याने गावोगावी शाळा व्यवस्थापन समितीचे ठराव करून या निर्णया विरूध्द आवाज उठवला जाणार असल्याची माहिती शिक्षक भारती प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली.

या मोहिमेला विद्यार्थी मित्र, पालक, ग्रामस्थ, समविचारी संघटना, सामाजिक संस्था, शिक्षक भारतीचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीच्या
ठरावाची एक प्रत जिल्हा अधिकारी, दुसरी प्रत आमदार कपिल पाटिल यांना पाठवण्यात येणार आहे. हा लढा एवढ्या वर न थांबवता सोमवार ( दिनांक १७ ऑक्टोबर) गावपातळीवरील आलेले ठराव जिल्हास्तरावर एकत्र करून जिल्हा संघटने मार्फत मा.जिल्हाधिकारी यांना शाळा बंद करण्यात येवू नये. म्हणून निवेदन व ठराव प्रती व आमदार कपिल पाटील ठरावाच्या प्रती स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, ग्रामविकास मंत्री याना देणार आहेत.
आगामी हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात शिक्षक भारती व छात्र भारती विद्यार्थी संघटनेतर्फे होणाऱ्या मोहिमेत सहभागी व्हावे. असे आवाहन राज्य उपाध्यक्ष द्या नाईक, राज्य संघटक किसन दुखंडे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे सरचिटणीस अरूण पवार महिलाध्यक्ष आशा गुणीजन, महिला सचिव वैशाली गर्कल, मुख्य सल्लागार महेश नाईक, कोषाध्यक्ष रविंद्र देसाई यांनी केले आहे

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स