भाजपा वेंगुर्ले च्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त "सेवा पंधरवडा " चा शुभारंभ सागर किनारा स्वच्छता अभियानाने संपन्न..!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर प्रथम अभियान राबवीले ते ” स्वच्छ भारत मिशन ” ह्या अंतर्गत घरोघरी शौचालये, कचरा मुक्त शहर असे उपक्रम राबवुन जनतेपर्यंत स्वच्छतेचे महत्व पटविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात आपला परीसर स्वच्छ असला पाहिजे ही भावना निर्माण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोलाचा वाटा आहे. म्हणुनच त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे आवडते अभियान ” स्वच्छता अभियान ” आयोजित करुन ” सेवा पंधरवडा ” कार्यक्रमाचा वेंगुर्ले तालुक्याचा शुभारंभ केला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)