ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मासेमारीवर होतोय हवामान बदलाचा परिणाम

मासेमारीवर होतोय हवामान बदलाचा परिणाम

प्रकाशन: 31 Aug 2021 12:08 PM
वाचन संख्या 93

वैभव माणगांवकर / मालवण : गेल्या आठ दिवसांपासून अचानक वारा दक्षिणेकडून वाहत असल्याने किनार्‍यालगत येणारी मासळी अचानक गायब झाली आहे. त्यामुळे मच्छीमारांना मध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले दिसत आहे. मुंबई मासेमारीच्या सुरुवातीला ऑगस्ट महिन्यात उत्तरेकडून हळुवारपणे वाहणारे वारे मासेमारीला पोषक असतात असे मच्छीमारांचे म्हणणे आहे. मच्छीमारांसाठी हा हंगाम फार महत्वाचा असतो कारण यावेळी किनार्‍यालगत भरपूर मासळी असते. हवामान बदलामुळे गेला आठवडाभर मासेमारीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून येत आहे पाच-सहा दिवसांपुर्वी हिंदी महासागरानजिक इंडोनेशिया जवळ समुद्रात भूकंप झाल्याचे समजतेय. तेथे समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचेही सांगितले जात आहे. तेव्हापासून या वातावरणात बदल झाल्याचे जाणवते वाऱ्याने दिशा बदलली आहे आणि दक्षिणेकडून वारा वाहतोय सोबतच पाण्याचा प्रवाह देखील दक्षिणेकडून उत्तरेच्या दिशेला आहे. त्यामुळे मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे परिणामी माशांचे भाव पुन्हा कडाडले आहेत. सध्या अरबी समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. असे मच्छीमारांकडून समजत आहे. या दिवसांमध्ये समुद्राच्या पाण्याला शेळ लागते ही शेळ १० ते १६ ऑगस्ट यादरम्यान जाणवली पण दक्षिणेकडून वारे वाहू लागल्यामुळे हि शेळ जाणवणे बंद झाले या सर्व वातावरण बदलांचे विपरीत परिणाम मासेमारीवर होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स