ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल स्टुडिओत झाले दांडीवरील श्री रामेश्वर प्रासादीक झालझुल महिला भजन मंडळाचे रिंगण भजन सादरीकरण.

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल स्टुडिओत झाले दांडीवरील श्री रामेश्वर प्रासादीक झालझुल महिला भजन मंडळाचे रिंगण भजन सादरीकरण.

प्रकाशन: 07 Sep 2022 11:23 AM
वाचन संख्या 70

मालवण | विनीत मंडलिक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये शहरातल्या दांडी येथील ‘श्री रामेश्वर प्रासादीक झालझुल महिला भजन मंडळाने’ उभ्याने रिंगण भजन हा अनोखा भजनभक्ती सोहळा सादर केला.

यावेळी प्रमुख बुवा तथा गायिका म्हणून दिव्या मालंडकर, जयदेव लोणे मृदुंग तर की बोर्डवर राजेश कांदळगांकर यांची साथ लाभली.
यावेळी महिलांनी सलग एक तास फेर धरुन भजन सादरीकरण केले आणि आरतीने सोहळ्याचा समारोप झाला.
यावेळी मंडळाचे प्रबंधक जयदेव लोणे यांच्यासह राजेश बांदकर व पांडुरंग सारंग विशेष उपस्थित होते.
दांडी येथील सृजनशील महिला सौ.वैष्णवी मालंडकर यांच्या संकल्पनेतून या ‘श्री रामेश्वर प्रासादीक झालझुल महिला भजन मंडळाची’ संकल्पना उभी राहीली आहे आणि गेली सहा वर्षे हे भजन मंडळ त्यांचे भजन सादरीकरण करत आहे.
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या मुख्य संचालक सौ. फिलोमीना पंडित यांनी मंडळातील सर्व सदस्यांचे आभार मानून त्यांना शुभेच्छा दिल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स