बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांनमध्ये भितीचे वातावरण
आचरा वरचीवाडी येथे वासरावर केला हल्ला
विवेकराजू परब / आचरा : आचरा परिसरात गेले काही महिने बिबट्याच्या वावराने ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचाच प्रत्यय आचरा वरची वाडी येथील महेंद्र आचरेकर यांच्या गाईच्या वासरावर काल बिबट्याने हल्ला करुन मारल्याची घटनेतून आला आहे यात आचरेकर यांचे मोठे नुकसान झाले आहे.
बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांन मधून वारंवार होत असून पण वनविभाग अजूनही कोणतीही भूमिका का घेत नाही. आता तरी वनविभाग या कडे लक्ष देईल का? असा प्रश्न ग्रामस्थान मधून विचारला जाऊ लागला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)