ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
उद्या राज्यपालांचा सिंधुदुर्ग दौरा जाहीर..

उद्या राज्यपालांचा सिंधुदुर्ग दौरा जाहीर..

प्रकाशन: 26 Aug 2022 11:12 AM
वाचन संख्या 89

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ ऑगस्टला एकदिवशीय जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. तळेरे येथे कॉलेजचे उद्घाटन व वेंगुर्ला येथे मरीन केंद्राचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी संबंधित यंत्रणांची आढावा बैठक घेत दौऱ्याचे सूचना दिल्या आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ ऑगस्टला सकाळी १०.१५ ला चिपी विमानतळ येथे आगमन तेथून कारने तळेरेकडे प्रयाण व ११.३५ ते १२.२५ तळेरे येथील व्ही. व्ही. कॉलेजच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, त्यानंतर कारने वेंगुर्ला फळसंशोधन केंद्राकडे प्रयाण व २ वाजता आगमन तेथे सौरभ गेस्टहाऊसला ३ ते ३ राखीव, त्यानंतर वेंगुर्ला नगरपालिका क्षेत्रातील मरीन केंद्राच्या उद्घाटनास ३.३० ते ४.१० ला उपस्थिती, त्यानंतर चिपी विमानतळाकडे प्रयाण व विमानाने मुंबईकडे प्रयाण.

राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने चोख नियोजनाची तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतल्यानंतर कणकवली प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी तरेळे येथे जाऊन कॉलेजची पाहणी केली. तर सावंतवाडी प्रांताधिकारी व वेंगुर्ला तहसीलदार यांनी वेंगुर्ला जागेची पाहणी केली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स