ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणात मशीद गल्लीच्या नाक्यावर मालवाहतूक करणारा ट्रक कलंडला..! (ब्रेकिंग)

मालवणात मशीद गल्लीच्या नाक्यावर मालवाहतूक करणारा ट्रक कलंडला..! (ब्रेकिंग)

प्रकाशन: 25 Aug 2022 04:36 PM
वाचन संख्या 824

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या मध्यवर्ती सोमवार पेठेतील मुख्य रस्ता ते मशीद गल्ली वळणावर मालवाहतूक करणारा एक छोटा ट्रक कलंडला आहे.


ही घटना आत्ता दुपारी 04:00 च्या दरम्यान घडली असून चालकाला अरुंद वळणाचा अंदाज न आल्याने ट्रकचे उजव्या बाजुचे मागचे चाक गटारात उतरुन ट्रक कलंडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

ट्रकमधील माल तत्काळ बाहेर काढून ट्रकला पूर्ववत रस्त्यावर आणून कोंडी हटवायचे प्रयत्न सुरु असून या छोट्या अपघातात कोणालाही इजा झालेली दिसून आलेली नाही. दुपारच्या वेळी थोडी वर्दळ कमी असल्याने मोठा अनर्थ टळल्याचेही प्रत्यक्षदर्शी उपस्थितांपैकी काहींनी सांगितले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स