ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
माजी खासदार निलेश राणे यांच्यासारखे दानशूर व दिलदार व्यक्तीमत्व जिल्ह्याच्या राजकारणात नाही : दत्ता सामंत.

माजी खासदार निलेश राणे यांच्यासारखे दानशूर व दिलदार व्यक्तीमत्व जिल्ह्याच्या राजकारणात नाही : दत्ता सामंत.

प्रकाशन: 24 Aug 2022 12:07 PM
वाचन संख्या 100

भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी निलेश राणेंसोबतच्या मतभेदांच्या अफवांचे केले खंडन..

मालवण | ब्युरो न्यूज :
मालवण आगामी विधानसभा निवडणुकीतनंतर मालवण कुडाळचे आमदार निलेश राणेच असतील अशी खात्री भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी व्यक्त केली आहे.

Article image

माजी खासदार निलेश राणे यांच्याशी आपले कोणतेच मतभेद नाहीत तर त्या निव्वळ अफवा असल्याचे भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत निलेश राणे यांच्या विजयाचे सारथ्य आपणच करणार हे विरोधकांनी लक्षात ठेवावे असेही ते म्हणाले.
निलेश राणे हे वडिलांवर प्रेम व निष्ठा असणारे भावनिक व सामाजीक नेतृत्व असून निलेश राणे यांच्या सारखा दानशूर आणि दिलदार व्यक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आज नाही हे सत्य आम्ही जनतेपर्यंत पोहचवणार असाही संदेश त्यांनी दिला.
२०२४ ला निलेश राणे आमदार होणारच. आगामी काळात निलेश राणे आणि मी एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणूनच काम करणार असे दत्ता सामंत यांनी घुमडे येथील घुमडाई मंदिरात बोलताना स्पष्ट केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स