आचरा ग्रामपंचायत अंतर्गत विविध स्पर्धाचे निकाल जाहिर.
निबंध स्पर्धेत चिंदरची सिध्दी संतोष अपराज प्रथम..
चिंदर | विवेक परब :
आचरा ग्रामपंचायत अंतर्गत निबंध, चित्रकला, वक्तृव, व कनिष्ठ महाविद्यालय माझा गाव माझ्या विकासाच्या कल्पना या विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यांचे निकाल जाहीर झाले असून विजेत्यांना ग्रामपंचायत आचरा मार्फत गौरविण्यात आले यावेळी आचरा सरपंच प्रणया टेमकर, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, सुरेश गावकर, उद्योजक जयप्रकाश परुळेकर, सर्व सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते
स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे -निबंध स्पर्धा (विषय – मासा गाव माझ्या विकासाच्या कल्पना) प्रथम क्रमांक सिद्धी संतोष अपराज, द्वितीय क्रमांक सुरभी दिपक त्रिंबककर, तृतीय क्रमांक मयुरेश अनिल शिर्सेकर, चित्रकला स्पर्धा निकाल- प्रथम वेदांत सचिन तवटें (आचरा हायस्कूल), द्वितीय जीवन संतोष मेस्त्री (हिर्लेवाडी शाळा), तृतीय भार्गवी प्रकाश महाभोज(आचरा हायस्कूल) वक्तृत्व स्पर्धा निकाल- प्रथम सई अंकुशराव घुटूकडे (आचरा हायस्कूल), द्वितीय स्नेहल मंदार घाडी केंद्रशाळा, तृतीय मयुरेश विद्यानंद धुरी(पिरावाडी शाळा ), निबंध स्पर्धा निकाल- प्रथम श्रावणी गंगाराम पोटधन (पिरावाडी), द्वितीय नुर्वी गिरीश शेटये, तृतीय नमिता सुदर्शन वस्ते (बागजामडूल)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)