ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चौके-कुडाळ मार्गावरील काळसे येथील खड्डा ठरतोय अपघातांच कारण..!

चौके-कुडाळ मार्गावरील काळसे येथील खड्डा ठरतोय अपघातांच कारण..!

प्रकाशन: 17 Aug 2022 04:50 PM
वाचन संख्या 146

तातडीने खड्डा बुजवण्याची नागरिकांची मागणी….!

चौके | अमोल गोसावी :
मालवण चौके कुडाळ मुख्य रस्त्यावर श्री राम मंदिर नजीक आणि आजगावकर आजी इको स्टोअर च्या समोर रस्त्याच्या मधोमध भला मोठा खड्डा पडून याठिकाणच्या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे.

सदर खड्डा पडून दोन महिने उलटले तरी संबंधित बांधकाम विभागाने अजून तो खड्डा तसेच त्याच्या आजूबाजूला असलेले खड्डे बुजवण्यासंबधीत कोणतीच कार्यवाही केलेली नाही. सुमारे एक फूट खोलीचा हा खड्डा मात्र या मार्गावरील वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या काही दिवसात या धोकादायक खड्ड्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झालेला आहे. त्यात काही जण किरकोळ जखमीही झाले आहेत.

बांधकाम विभागाच्या उदासिनतेमुळे दोन महिने उलटले तरी या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. उलट दिवसेंदिवस त्या खड्ड्याची खोली आणि लांबी रुंदी वाढतच आहे. याबद्दल वाहनचालक आणि स्थानिक रहिवासी यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आणि काळसे रवळनाथ मंदिर ते राममंदिर या परिसरातील मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे संबंधित बांधकाम विभागाने तातडीने बुजवावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री. रमेश मयेकर, आणि श्री. राहुल कुळकर्णी यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही श्री. मयेकर यांनी दिला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स