<em>७५ वर्षांवरील ज्येष्ठांना ‘एसटी ’ मोफत ; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय………!</em>
मुंबई | ब्यूरो न्यूज : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसगाडय़ांमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली. राज्यात ६५ हून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सध्या प्रवासभाडय़ात ५० टक्के तर शिवशाही बसेसमध्ये ४५ टक्के सवलत दिली जाते. आता ७५ हून अधिक वय असलेल्या ज्येष्ठांना एसटी प्रवासाची मोफत सुविधा उपलब्ध होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)