ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सेवानिवृत्त शिक्षिका कल्याणी कांबळी यांच्या हस्ते मर्डे ग्रामपंचायतचे ध्वजवंदन..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सेवानिवृत्त शिक्षिका कल्याणी कांबळी यांच्या हस्ते मर्डे ग्रामपंचायतचे ध्वजवंदन..!

प्रकाशन: 14 Aug 2022 12:05 PM
वाचन संख्या 137

शैक्षणिक योगदानाबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार..!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त मर्डे ग्रामपंचायतचे ध्वजवंदन मसुरे येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका कल्याणी कांबळे यांच्या हस्ते करून मर्डे सरपंच संदीप हडकर, उपसरपंच राजेश गावकर, ग्राम. विकास अधिकारी शंकर कोळसुलकर आणि सर्व सदस्यांनी एक अनोखा उपक्रम घडवून आणला.

यावेळी बोलताना श्रीमती कांबळी मॅडम म्हणाल्या, मर्डे ग्रामपंचायत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज मला जो मान दिला आहे हा माझ्या जीवनातील अतुलनीय असा प्रसंग आहे. माझ्या या सर्व विद्यार्थ्यांचा मला नेहमीच सार्थ अभिमान आहे. सरपंच संदीप हडकर म्हणाले, मसुरे गावच्या सर्वांना गुरूतुल्य असलेल्या व माझ्याही गुरु असलेल्या कांबळी मॅडम यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झाले.आम्हा सर्वांच्या हृदयात घर करून असलेल्या या माऊलीचे या निमित्ताने आम्ही ऋण व्यक्त करतो. सर्वांना अभिमान वाटावा असे कार्य कांबळी मॅडम यांनी केले आहे. या वेळी मसुरे केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शर्वरी शिवराज सावंत यांच्या शुभहस्ते आदर्श शिक्षिका कांबळी मॅडम यांचा त्यांच्या आज वरच्या कार्याचा गौरव म्हणून मर्डे ग्रामपंचायतच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच राजेश गावकर, ग्रामपंचायत सदस्य जगदीश चव्हाण, पप्पू मुळीक, सचिन पाटकर, श्री सावंत, मंडल अधिकारी श्री चव्हाण, मसुरे केंद्रप्रमुख नारायण देशमुख, श्री गावडे सर,विनोद कदम, गुरुनाथ ताम्हणकर, श्रीमती मगर मॅडम, शामा सावंत, नरेन हिंदळेकर,हेमलता दुखंडे, महेश खोत, विनोद मोरे, सुदर्शन मसुरकर, कमलेश ठाकूर, शैलेश मसुरकर, पोलीस पाटील नेवेश फर्नांडिस,श्री परब, मसुरे पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी, शालेय शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग, होमगार्ड वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स