मालवणात नारळी पौर्णिमा भर पावसातही पारंपारिक चैतन्याने संपन्न.
खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते समुद्राला नारळ अर्पण.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व्यापारी संघ व मच्छीमारांच्या वतीने आज मालवणात नारळी पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक व मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते समुद्राची विधिवत पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या व मालवणी संस्कृती व वारसा मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या नारळ लढविणे (महिलांकरीता) स्पर्धेचे उद्घाटन खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी खासदार विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रचंड वारा व पावसाने ही स्पर्धा संपन्न होऊ शकली नाही.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महेश कांदळगावकर, मंदार केणी, यतीन खोत, शिल्पा खोत,सन्मेश परब, दिपा शिंदे, आकांक्षा शिरपुटे, सौ.जाधव व मालवण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)