<em>कास बांदा एस.टी. रस्त्याच्या कडेला कलंडली..!</em>
बांदा | राकेश परब :
कास बांदा एस .टी.बस शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना चिखलात रूतल्याने रस्त्यांच्या कडेला कलंडल्याची घटना आज सकाळी घडली.सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.
पाईपलाईनसाठी ठेकेदाराने जवळपास एक मीटर खोल खोदाई करून नुसती मातीने चर बुझवल्याने साईडपट्टी धोकादायक झाली आहे.बस चिखलामधे रूतल्याने मागील चाक ऊचलल्याने बस पलटी होताना वाचली.बस पलटी झाली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.बस कलंडल्याची घटना कळताच कास ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बस काढण्याचे अथक प्रयत्न केले मात्र बसची मागील व पुढचे चाक खोलवर रूतल्याने बस काढणे शक्य न झाल्याने अखेर चालक व वाहकाने याची खबर सावंतवाडी एस. टी.डेपोला दिली.यावेळी देविदास सातार्डेकर,ग्रा.प.सदस्य संदेश भाईप,विश्वनाथ गावडे,ऊदय सातार्डेकर,अजित भाईप तसेच कास ग्रामस्थानी सहकार्य केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)