ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>विषयावर प्रभूत्व असणारे शिक्षक मिळणे शाळेचे भाग्यच-प्रभाकर कुडतरकर.</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>विषयावर प्रभूत्व असणारे शिक्षक मिळणे शाळेचे भाग्यच-प्रभाकर कुडतरकर.</em>

प्रकाशन: 09 Aug 2022 01:24 PM
वाचन संख्या 50

कासार्डे ज्यु.काॅलेजचे प्रा.रमेश मगदूम सेवानिवृत्त.

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
शाळा काॅलेजला अभ्यासू आणि विषयावर प्रभूत्व असणारे शिक्षक मिळणे हे त्या शाळेचे भाग्यच म्हणावे लागेल, आमच्या काॅलेजलाही प्रा. रमेश मगदूम सारखे इंग्रजी आणि इतिहास विषयावर प्रचंड प्रभुत्व असणारे शिक्षक आमच्या काॅलेजच्या विद्यार्थ्यांना मिळाले ही अभिमानाचा बाब असल्याचे गौरवोद्गार प्रभाकर कुडतरकर यांनी काढले.

कासार्डे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा.आर जे मगदूम नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने आयोजित सेवापुर्ती सोहळ्यात कार्याध्यक्ष प्रभाकर कुतरकर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर स्थानिक व्यवस्था समितीचे सदस्य रविंद्र पाताडे, प्राचार्य एम.डी.खाड्ये, खारेपाटण महाविद्यालयचे प्राचार्य ए.डी. कांबळे,कासार्डे विद्यालयाचे माजी प्राचार्य आर.व्ही.नारकर,पालक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष मारुती वळंजू,प्रा.सय्यद,प्रा.इंदप- खारेपाटण, सत्कारमूर्ती प्रा. रमेश मगदूम,सौ.मगदूम व पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचा शुभारंभ सरस्वती पुजन व दिप प्रज्वलनाने झाला. त्यानंतर उपस्थित मान्यवर गुलाबपुष्प देऊन प्राचार्य मधुकर खाड्ये यांनी स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.मुगदूम म्हणजे हरहुन्नरी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व असल्याचे त्यांनी गौरव उद्गार प्राचार्य एम.डी. खाड्ये यांनी काढले.

सोन्याची अंगठी आणि चांदीची गणेश मुर्ती देऊन सत्कारमूर्तींचा गुणगौरव करण्यात आला. कासार्डे विकास मंडळ मुंबई संस्थेच्यावतीने चांदीची गणेशमूर्ती तसेच ,शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सेवानिवृत्त प्रा. मुगदूम यांचा तर सौ.मगदूम यांचाही साडी चोळीने ओटी भरून सत्कार करण्यात आला.शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावतीने सत्कारमूर्तींचा सोन्याची अंगठी व पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी प्राचार्य आर.व्ही.नारकर, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य ए.डी. कांबळे, प्रा.सय्यद, शिक्षकांच्यावतीने पी.जे.काळे,ए.डी.नलवडे,सौ. बी.बी. बिसुरे,श्रीम.एस.डी.राणे,प्रा. डी.डी. देवरुखकर,आदींनी मनोगत व्यक्त करताना प्रा.मगदूम यांच्या आठवणी सांगत त्यांच्या कार्यप्रणालीचे विशेष कौतुक केले.

याप्रसंगी सौ.मगदूम यांनी सर्वाचे आभार मानले तर विद्यार्थ्यीवर्गा मार्फत प्रणव हुले व कु. मालिनी लाड यांनी मनोगत व्यक्त केले.शेवटी पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर यांनी आभार मानून या सेवापूर्ती सोहळ्याची सांगता केली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स