ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात भाजपा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे- एकनाथ नाडकर्णी.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात भाजपा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे- एकनाथ नाडकर्णी.

प्रकाशन: 05 Aug 2022 11:31 AM
वाचन संख्या 61

चिंदर | विवेक परब :
भारत आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पुर्ण करणार आहे. आपण सगळेच या अत्यंत अद्भुत आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनणार आहोत. देवाने आपल्याला हे खुप मोठे सौभाग्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी केलेल्या आवाहनाला सर्व साथ देत दिनांक ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या दरम्यान स्वराज्य मोहोत्सवात उस्फूर्तपणे सहभागी होऊन स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करुया, असे प्रतिपादन भाजपा “हर घर तिरंगा” अभियानाचे जिल्हा संयोजक एकनाथ नाडकर्णी यांनी वेंगुर्ले भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.
वेंगुर्ले भाजपा कार्यकर्त्यांची बैठक तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ” स्वराज्य मोहस्तव २०२२ व हर घर तिरंगा या अभियानाची माहिती दिली. तसेच वेंगुर्ले तालुक्यातील ९३ बुथवर भाजपा चे बुथप्रमुख व बुथकमीटीतील कार्यकर्ते प्रत्येक बुथमधील कुटुंबाला तिरंगा मिळाला की नाही याची खातरजमा करून तो झेंडा कशा प्रकारे लावावा याबाबत माहिती देतील, तसेच सार्वजनिक ठिकाणी झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित करतील असे नियोजन करण्यात आले.
तसेच वेंगुर्ले तालुक्यात तिरंगा मोटरसायकल रॅली, स्वच्छता अभियान, महिला बचत गटांना मार्गदर्शन, तिरंगा सायकल रॅली, शेतकर्यांना मार्गदर्शन, तिरंगा दौड, वृक्षारोपण, मशाल फेरी, प्रभात फेरी, देश भक्तीपर समूहगीत स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर यांनी एकनाथ नाडकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच नगराध्यक्ष राजन गीरप यांनी वेंगुर्ले शहरातील अमृतमहोत्सव कार्यक्रमाची माहिती दिली व शहरातील कार्यकर्त्यांनी त्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अँड सुषमा खानोलकर व सोमनाथ टोमके, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.उपाध्यक्ष – प्रीतेश राऊळ – मनवेल फर्नांडिस – लक्ष्मीकांत कर्पे, युवा मोर्चाचे संदीप पाटील – तुषार साळगांवकर – भुषण सारंग, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, नगरसेवक प्रशांत आपटे, ता.चिटणीस जयंत मोंडकर, जेष्ठ नेते प्रकाश रेगे, अँड. जी.जी.टाककर, महिला मोर्चा शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, महिला मोर्चाच्या – वृंदा गवडंळकर – वृंदा मोर्डेकर – आकांक्षा परब – सारिका काळसेकर. शक्ती केंद्र प्रमुख – महादेव नाईक ( आरवली ) – जगंन्नाथ राणे ( रेडी ) – संतोष शेटकर ( तुळस ) – नितीन चव्हाण ( वजराठ ) – कमलेश गावडे ( पाल ) – सुधीर गावडे ( वेतोरे ) – विजय बागकर ( आसोली ) – विद्याधर धानजी (शिरोडा ) – सुनील चव्हाण ( परुळे ) – रुपेश राणे ( कुशेवाडा ) – निलेश मांजरेकर ( उभादांडा ), तुळस सरपंच शंकर घारे, प्रभारी ज्ञानेश्वर केळजी, शिरोडा शहर अध्यक्ष संदिप धानजी, ता.का.का.सदस्य सुनील घाग, खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर, बुथप्रमुख – शेखर काणेकर – नारायण गावडे – पुंडलिक हळदणकर – वसंत परब इत्यादी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 438

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स