ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी….!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी….!

प्रकाशन: 13 Jul 2022 09:06 PM
वाचन संख्या 39

कणकवली | प्रसन्ना पुजारे :
      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर  महाविद्यालय प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत, रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.हसन खान, प्रा.स्नेहा बर्वे, प्रा. अन्वेशा कदम,प्रा. मिलन सामंत आदी उपस्थित होते.
         यावेळी प्राचार्या सामंत यांनी समाजाची असलेली गुरुची भूमिका विषद केली. समाज हा आपल्याला अनेक प्रकारे जीवन धडे देत असतो आणि त्या अनुभवांमधून आपण अनेक गोष्टी शिकतअसतो.विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतांचे विशेष कौतुक यावेळी त्यांनी केले.
        यावेळी प्राचार्य हसन खान यांनी निसर्ग हा सर्वश्रेष्ठ गुरू आहे याविषयी माहिती दिली.तसेच स्वतःला शोधण्याचा मार्ग गुरू दाखवण्याच्या प्रयत्न करतो याविषयी आपले मत व्यक्त केले.
        यावेळी  सानिया अटक, श्रेया निकम, सौरभ साळकर यांनी गुरूशिष्य विषयी आपल्या भावना, मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन बारावी विद्यार्थिनी अर्पिता पालव यांनी तर आभार चिन्मय कदम याने केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स