शंकर उर्फ जीजी खोत यांचे निधन.
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे टोकळवाडी येथील ज्येष्ठ शिवसैनिक शंकर उर्फ जिजी बाळकृष्ण खोत वय ७३ वर्षे यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक निधन झाले. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा मर्डे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शंकर खोत यांच्या निधनाने मसुरे गावावरती शोककळा पसरली आहे.
शंकर खोत यांचे मसुरे येथील सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान होते. जुन्या जमान्यातील ते एक उत्कृष्ट हॉलीबॉलपटू आणि नाट्यकलाकार होते. मसुरे गावच्या सामाजिक कला क्रीडा राजकीय क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले होते. मसुरे गावातील विविध मंडळात त्यांनी कार्य केले होते. आर पी बागवे हायस्कूल मसुरे शालेय समितीचे ते विद्यमान सदस्य होते.
मसुरे गावातील नाट्य चळवळ उभारी घेण्यात त्यांचा मोठा हात होता. मुंबई येथे पोर्ट ट्रस्ट मधून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, भाऊ, भावजय पुतणे,पुतणी, नातवंडे असा मोठा परिवार असून मर्डे येथील कोतवाल आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू श्रीकांत खोत यांचे ते वडील, युवा कार्यकर्ते आशिष आणि प्रसाद खोत यांचे ते काका तर मर्डे ग्रामपंचायतचे लिपिक महेश खोत यांचे ते आजोबा आणि सामाजिक कार्यकर्ते आबा खोत यांचे काका होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)