संततधार पावसामुळे पळसंब येथील शेत मांगर व राहते घर यांचे नुकसान.
क्षतीग्रस्त जुवेकर व तर्फे कुटुंबियांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांची मागणी
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना समोर येत आहे. अशीच घटना काल मालवण तालुक्यातील पळसंबला घडली. पळसंब मधील बापुजी जुवेकर यांचे राहते घर व सुभाष तर्फै यांचा कौलारु छपर असलेला शेत मांगर पावसामुळे कोसळला.
सरपंच चंद्रकांत गोलतकर व तलाठी वैशाली कदम यांनी घटनास्थळी जावून पंचनामे केले. यावेळी बापुजी जुवेकर यांच्या घराचे अंदाजे 46000 राचे व सुभाष तर्फे 17950 रु नुकसान झाले. रितसर पंचनामा झाला आहे आणि या क्षतीग्रस्त जुवेकर व तर्फे कुटुंबियांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी शासन व प्रशासनाकडे आपली मागणी असल्याचे पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)