ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
समस्त मुंबईस्थीत पळसंब वासियांना अनोख्या पद्धतीने मिळणार आषाढ वारीचा आनंद..! (विशेषवृत्त)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

समस्त मुंबईस्थीत पळसंब वासियांना अनोख्या पद्धतीने मिळणार आषाढ वारीचा आनंद..! (विशेषवृत्त)

प्रकाशन: 05 Jul 2022 11:38 AM
वाचन संख्या 246

गोरेगांवातील मसुराश्रमात रंगणार “विठू नामाचा गजर..!”

कणकवली | प्रसन्ना पुजारे (विशेषवृत्त) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांव व मुंबईस्थीत पळसंबवासीय यांचे सामाजिक,शैक्षणिक,औद्योगिक स्तरांवर विविध उपक्रम सुरु असतात.
येत्या रविवारी म्हणजे 10 जुलैला , मुंबईस्थीत पळसंब वासियांसाठी रिद्धी क्रिएशन व स्वर पराग निर्मित ‘आम्ही वारकरी विठ्ठलाचे’ हा भक्ती नजराणा घेऊन येत आहेत.

आषाढ महिना महिना आला की सर्व विठ्ठल भक्तांना ओढ लागते ती वारीची, ऊन पाऊस वयाचा विचार न करता लाखो भक्त पायी पंढरीच्या वाटेने श्री संत तुकाराम आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी बरोबर चालत असतात. सर्वसामान्य म मुंबईकर भक्तांना इच्छा असूनही हे प्रापंचीक व्यस्ततेमुळे शक्य नसते म्हणून ‘रिद्धी क्रिएशन व स्वर पराग निर्मित’ या भक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याचा शुभारंभ ,रविवार १० जुलैला गोरेगांव पूर्व येथील सुप्रसिद्ध मसुराश्रम येथे, ‘रिद्धी क्रिएशन आणि स्वर पराग’ निर्मित ‘आम्ही वारकरी विठ्ठलाचे’ हा विठ्ठल भक्तिमय गीतावर आधारित गायन नृत्य दिंडी अशा भक्तिमय कार्यक्रमाद्वारे होत आहे.

या कार्यक्रमात समस्त मुंबईस्थीत पळसंब वासियांनी सहभागी होऊन विठ्ठल अनुभूतीचा अनुभव घ्यावा असे आवाहन व निमंत्रण आपले नम्र रिद्धी क्रिएशन आणि स्वर पराग संस्थेच्या विठ्ठल भक्तांनी केले आहे.


गोरेगांव (पूर्व) येथील मसूराश्रम हॉल, पांडुरंग वाडी, रोड नंबर ४ इथे हा सोहळा आयोजीत केला गेला असून मसुराश्रम हे ठिकाण गोरेगांव रेल्वे स्टेशनपासून चालत अवघ्या दहा मिनिटांवर आहे.
या सोहळ्याविषयी अधिक माहितीसाठी 9819902414/9619971485 या दोन भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधायची सोय केली गेली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स