ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
हेदूळ येथे १ जुलै रोजी कृषी मेळावा..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

हेदूळ येथे १ जुलै रोजी कृषी मेळावा..!

प्रकाशन: 30 Jun 2022 07:55 PM
वाचन संख्या 47

मसुरे | प्रतिनिधी : हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त मालवण पंचायत समिती, राज्य शासनाचा कृषी विभाग व हेदूळ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने १ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता हेदूळ पूर्ण प्राथमिक शाळा येथे कृषी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये विशेष अतिथी व उद्घाटक म्हणून आमदार वैभव नाईक, गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी कृषी व संलग्न विभागाकडील विविध योजना व सुधारित कृषी तंत्रज्ञानाबाबत तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, नंददीपक गावडे यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स