ताज्या बातम्या
श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत.
<em>तारकर्ली गावात सातत्याने होणारा विजेचा खेळखंडोबा थांबवा : तारकर्लीवासियांचा विद्यूत महामंडळाला इशारा..!!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>तारकर्ली गावात सातत्याने होणारा विजेचा खेळखंडोबा थांबवा : तारकर्लीवासियांचा विद्यूत महामंडळाला इशारा..!!</em>

प्रकाशन: 02 Jun 2022 01:20 PM
वाचन संख्या 40

तारकर्ली । सुरेश बापर्डेकर :

तारकर्ली गावातील विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत असून विद्युत तारांना लागत असलेल्या झाडांच्या फांद्या अतिप्रमाणात वाढलेल्या आहेत. आठ दिवसांच्या कालावधीत त्या हटवून विद्यूत पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा नागरिकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. असे निवेदन तारकर्ली येथील त्रस्त विद्युत ग्राहक व नागरिक यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे.

या प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्याप्रमाणे, मां. उपकार्यकारी अभियंता, उपविभागीय कार्यालय महावितरण मालवण यांना निवेदनाची प्रत देऊन तारकर्ली गावातील सातत्याने विद्युत पुरवठा खंडीत होत असल्या संबंधी सूचना करण्यात आल्या आहेत.

या सूचनांची, मागण्यांची तिव्रता लक्षात घेऊन शक्य तितक्या लवकर कार्यवाही करून नागरिकांना होणारा नाहक त्रास थांबवावा असे सांगण्यात आले आहे.

तारकर्ली गाव हे पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाचे असल्याने या गावात नेहमीच पर्यटकांची वर्दळ वाढलेली दिसून येते.

तारकर्ली गावात गेले कित्येक महिने विजेचा खेळ खंडोबा होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले असून तारकर्ली रहिवास्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर असल्याचे दिसून येत आहे.

जर हा खेळ खंडोबा वेळीच थांबला नाही तर मोठा उद्रेक होईल व याला सर्वस्वी महावितरण अधिकारी जबाबदार असतील असे ग्रामस्थांच्यावतीने कळविण्यात आले आहे.

सततच्या वेळीअवेळी विद्युत पुरवठा खंडीत होण्यामूळे कित्येकांची विद्युत उपकरणे नादुरुस्त झालेली आहेत, सद्या होत आहेत. हा भुर्दंड ग्राहकांचा विनाकारण सोसावा लागत आहे. उष्णतेने नागरिक आणि पर्यटक हैराण होत असून पुढे पावसाळ्याची सुरूवात झाल्यास अधिक भिषण समस्या उभ्या राहतील असे ग्रामस्थांचे मत आहे.

त्यातच विद्युतवाहिन्यांना स्पर्श करणा-या झाडाच्या फांद्या, झावळे हा देखील कळीचा मुद्दा बनला आहे.

तरी पाहणी करून येत्या आठ दिवसात दुरुस्तीची कामे सुरू करण्यासंबंधीच्या सूचना संबंधितांना देण्यात याव्यात व त्वरीत सर्व समस्यांमधून तारकर्लीवासियांची मुक्तता करावी असे मालवण महावितरण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स