जगात युद्ध नको तर बुद्ध हवेत ; पि के चौकेकर ..
चौके | प्रतिनिधी : जगाला युध्दाची नाही तर बुध्दाची गरज आहे ..समतामूलक समाजाच्या निर्मितीसाठी सर्व महामानवांनी , संतांनी महान कार्य केले ते मानवतावादी विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पी. के.चौकेकर यांनी चौके समाज मंदिर येथील संयुक्त जयंती कार्यक्रमात बोलताना केले…
भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती चौके सम्यकनगर समाज मंदिर येथे सहयोग बौद्ध विकास मंडळ, जागृती महिला मंडळ व भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा चौके यांच्या वतीने येथे साजरी करण्यात आली.. कार्यक्रमाची सुरुवात सुभाष चौकेकर यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करून व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मंडळाचे सल्लागार पी. के. चौकेकर यांच्या हस्ते समाज मंदिर प्रांगणात वृक्षारोपण करून झाले. यावेळी आयोजित जाहीर सभेत आयु. पी. के. चौकेकर बोलत होते धम्म पिठावर मालवण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. मनिषा वराडकर, मंडळाचे पदाधिकारी यशवंत चौकेकर, लक्ष्मण चौकेकर, साबाजी चौकेकर, दुलाजी चौकेकर, अंनिसचे विजय चौकेकर, सुभाष चौकेकर,अशोक चौकेकर, डॉ.काळसेकर, ग्रामपंचायत सदस्य दिपिका चौकेकर, मनोज चौकेकर, महिला मंडळ अध्यक्ष आम्रपाली चौकेकर, सिध्दार्थ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री.पी.के.चौकेकर म्हणाले ज्या समाजाला जातीच्या आधारावर हक्क अधिकार नाकारला त्या विषमतावादी व्यवस्थे विरूद्ध बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करुन संविधानाच्या माध्यमातून देशातील तमाम वंचित घटकांना व महिलांना समान न्याय व संधी उपलब्ध करून दिली .
विजय चौकेकर यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेब आंबेडकर केवळ दलीतांचे नसून सर्व भारतीयांना नेते आहेत. अनीष्ठ रुढी परंपरा नाकारुन चिकित्सक व विज्ञान वादी बना असे आवाहन केले. यावेळी यशवंत चौकेकर, साबाजी चौकेकर, दुलाजी चौकेकर, मनिषा वराडकर, सिध्दार्थ जाधव, अशोक चौकेकर, डॉ काळसेकर यांनी विचार मांडले.
या कार्यक्रमात .
गेली पस्तीस वर्षे नोकरी सांभाळून या जिल्ह्यात सामाजिक, राजकीय क्षेत्रात फुले, शाहू,आंबेडकर विचारधारेचे प्रामाणिकपणे काम करणारे पी.के.चौकेकर यांना सन्मानपत्र देऊन सपत्नीक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावाळी माजी सभापती मनिषा वराडकर, रामचंद्र कदम, नामदेव चौकेकर, जयश्री चौकेकर यांना सन्मानित करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा मालवण तालुक्याच्या वतीने आयोजित केलेल्या
बालश्रामणेर शिबिरात सहभागी बालकांचा सत्कार करण्यात आला तसेच बौद्ध धम्म आचरणात आणण्यासाठी २२ प्रतिज्ञा महत्त्वाच्या आहेत म्हणून २२प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा घेण्यात आली त्या स्पर्धेतील विजेत्यांना साबाजी चौकेकर यांच्या कडून बक्षिसे देण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सरचिटणीस कृष्णा चौकेकर यांनी केले तर किशोर कदम यांनी आभार मानले.
सायंकाळी भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची चौके बाजारपेठेत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिवप्रसाद चौकेकर, रोहन चौकेकर, अमित चौकेकर, आकाश चेंदवनकर, अनंत ब.चौकेकर, सुमित चौकेकर, रामचंद्र कदम, रुपेश जाधव, शुभम चौकेकर, राहुल चौकेकर, भूषण चौकेकर, अतुल चौकेकर, सर्वेश चौकेकर , अनंत बा.चौकेकर तसेच जागृती महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)