भगवान बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून चौके येथे पर्यावरण जागर ; पि.के.चौकेकर यांच्या हस्ते झाले वृक्षारोपण.
चौके | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील चौके येथे वेगळ्या पद्धतीने बौद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. बुद्ध पौर्णिमेच्या मंगलदिनी चौके सम्यक नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे वृक्षारोपण करून पर्यावरण पूरक संदेश समाजाला देण्यात आला.
वृक्षारोपण करताना स्थानिक मंडळाचे सल्लागार पी. के. चौकेकर, सोबत मालवण पंचायत समिती माजी सभापती मनिषा वराडकर आणि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)