ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मानवता विकास परिषदेचा रत्नागिरी जिल्ह्यात कृषि अभ्यास दौरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मानवता विकास परिषदेचा रत्नागिरी जिल्ह्यात कृषि अभ्यास दौरा.

प्रकाशन: 10 Mar 2022 05:55 PM
वाचन संख्या 60

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: सिंधुदुर्ग मधील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती मिळावी विविध शासकीय शेतकऱ्यांसाठी च्या योजना तळागाळापर्यंत उत्सव व्हाव्यात यासाठी मानवता विकास परिषद च्या वतीने कृषी अभ्यास दौऱ्याचे आयोजन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांच्या अध्यक्षतेखाली केले होते. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध आधुनिक कृषी विषयक माहिती येथील प्रगतशील शेतकरी आणि कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा विनिमय करून या माहितीचा उपयोग सिंधुदुर्ग मधील शेतकऱ्यांसाठी करणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी यावेळी दिली. यानंतर पुढील टप्प्यात महाराष्ट्रातील विविध भागां मध्ये जाऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेऊन आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सधन बनविण्याचा मानवता विकास परिषदेचा उद्देश असल्याचेही बोलताना श्रीकांत सावंत म्हणाले.

रत्नागिरी येथील पाथरट गावातील श्री.शंकर धाडवे यांच्या सेंद्रिय शेतीला आणि विविध भागांना मान्यवरांनी भेट दिली . या वेळी जिल्हा नियोजन अधिकारी रत्नागिरी मा.मुळे साहेब मा.श्री.विजय पोकळे कृषी अधिकारी पं.स.रत्नागिरी, सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शक व आदर्श शेतकरी श्री.संदिप कांबळे,मा.श्री.श्रीकांत सावंत सं संस्थापक अध्यक्ष मानवता विकास परिषद मुंबई,मा.श्री.मुळे साहेब जिल्हा नियोजन अधिकारी रत्नागिरी, मा.सौ.मुळे मॅडम.व मा.श्री.अरून काटकर विस्तार अधिकारी कृषी मानवता विकास परिषदेचे सदस्य उपस्थित होते. नंतर सर्वांनी सेंद्रिय बचतगटाच्या महीलांची भेट घेतली व त्यांच्या उपक्रमांची माहिती घेतली.त्यानंतर ग्रामपंचायत खानू लाख सदिच्छा भेट दिली. त्यावेळी उपस्थित सरपंच ग्रामसेवक यांनी सर्वांचे स्वागत केले.ग्रामपंचायत भेटी नंतर मा.उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानाला भेट देण्यात आली व जैव विविधतेबाबत व देवराई मधील औषधी वनस्पतींची माहिती मान्यवरांनी जाणून घेतली . त्यानंतर जवळच असलेल्या कुलकर्णी यांच्या देवभूमी कृषी पर्यटन क्षेत्राला भेट दिली.सरते शेवटी सेंद्रिय ग्राम, जैवविविधता उद्यानाला भेट देऊन येथील माहिती घेतली.अनेक शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतीविषयक विविध माहिती जाणून घेतली तसेच या प्रगतशील शेतकऱ्यांना ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणून येथील शेतकऱ्यांना कशाप्रकारे शेतीपासून उत्पन्न घ्यावे याबाबतही त्यांचे मार्गदर्शन करून देण्यात येणार आहे. मानवता विकास परिषद चे अध्यक्ष श्रीकांत सामन्यांच्या या अनोख्या उपक्रमाला बाबत सर्व सदस्यांनी कौतुक केले..कॅप्शनरत्नागिरी जिल्ह्यातील पाथरी येथील प्रगतशील शेतकरी श्री शंकर धाडवे यांच्या सेंद्रिय शेती ला भेट देताना मानवता विकास परिषद चे अध्यक्ष श्रीकांत सावंत श्री मुळे साहेब आणि मान्यवर…छाया शैलेश मसुरकर.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स