ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
धातूची शेषधारी पिंडी आढळली पुरातन वडाच्या झाडात..!

धातूची शेषधारी पिंडी आढळली पुरातन वडाच्या झाडात..!

प्रकाशन: 09 Mar 2022 09:41 AM
वाचन संख्या 452

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घटना..!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे डांगमोडे येथील मोठा वरचा सडा आकेरी ब्राह्मण स्थळा नजीकच पाच दिवसांपूर्वी एका विशाल जुन्या वडाच्या झाडाच्या लगत सुमारे सव्वा ते दीड फूट उंचीची धातूची शेषधारी पिंडी ग्रामस्थांना आढळून आली आहे.  डांगमोडे वरचा सडा येथे जंगलमय भागामध्ये आग लागली होती. याच ठिकाणी डांगमोडे ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले आकेरी ब्राह्मणाचे देवस्थान असून याठिकाणी येथील ग्रामस्थ सार्वजनिक ब्राह्मणभोजन साजरे करतात.

पाच दिवसांपूर्वी जेव्हा येथील ग्रामस्थ ब्राह्मणभोजन करण्यासाठी या ठिकाणी गेले असता एका जुन्या वडाच्या झाडाच्या मध्ये ही पुरातन पिंडी या ग्रामस्थांना दिसून आली. गुरुवारी दहा मार्च रोजी डांगमोडे गावातील ग्रामस्थ या पिंडीची विधिवत प्रतिष्ठापना करणार असल्याची माहिती समोर येत असून इतिहास  संशोधकांनी या पिंडी ची पाहणी  करण्याचीही मागणी होत आहे.

डांगमोडे  गावातून घाटी रस्ता चालत साडे तीन किलोमीटर तसेच मसुरे पोलीस दूरक्षेत्रच्या समोरील डोंगरावरून चालत सुमारे चार किलोमीटर अंतरावर ही पुरातन पिंडी आढळली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स