तोंडवळी शाळा येथे विज्ञान जत्रेचे आयोजन.
चिंदर | विवेक परब : मालवण तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा तोंडवळी वरची येथे विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, स्वतः प्रयोग करुन वैज्ञानिक सत्यता पडताळून पहाता यावी, लहान लहान घटनांमागील कार्यकारणभाव समजावा यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिनी विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक सौ.शितल माडये, शिक्षक राजेश भिरवंडेकर, परशुराम गुरव,अशोक डोंगळे, रुपेश दुधे यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री महेश चव्हाण, ग्रामस्थ व पालकांनी मुलांचे कौतुक केले. केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर यांनी व्यक्तिशः भेटून विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)