ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
डेगवे-आंबेखणवाडीतील श्री ब्राह्मणीस्थळात श्री सत्यनारायणाच्या महापुजेचे आयोजन
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

डेगवे-आंबेखणवाडीतील श्री ब्राह्मणीस्थळात श्री सत्यनारायणाच्या महापुजेचे आयोजन

प्रकाशन: 01 Mar 2022 11:43 AM
वाचन संख्या 47

बांदा /राकेश परब : सावंतवाडी तालुक्यातील डेगवे -आंबेखणवाडीच्या श्री ब्राह्मणीस्थळात सोमवार दि.७ मार्च २०२२ रोजी श्री सत्यनारायणाची महापुजा आयोजित केली आहे.

डेगवे आंबेखणवाडी येथे सार्वजनिक श्री ब्राह्मणीस्थळ आहे.या स्थळात आंबेखणवाडीचे ग्रामस्थ प्रतिवर्षी श्री ब्राह्मणभोजन,श्री सत्यनारायणाची महापुजा,श्रावण महिन्यात सप्त सोमवारचे व्रत करणे,त्यानंतर ग्रामदेवता श्री माऊली पंचायतन देवता,श्री स्थापेश्वर महालक्ष्मी देवता तसेच श्री ब्राह्मणीस्थळात अभिषेक करणे .शिवाय इतर धार्मिक कार्यक्रम केले जातात.हि पंरपरा फार पुर्वजापासून म्हणजे अंदाजे सव्वाशे वर्षांपासून सुरू आहे

अलीकडेच परीसराच्या जिर्णोध्दाराचे काम ग्रामस्थ व भाविकांच्या सहभागातून पुर्ण केले आहे.त्यामुळे जिर्णोध्दारा निमित्ताने श्री सत्यनारायणाच्या महापुजेचे आयोजन केले आहे.

तरी भाविकांनी तिर्थ प्रसादाचा व रात्री महाप्रसादाचा,व भजनाचा,कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे स्थानिक ग्रामस्थ व मंदिर कमिटी च्या वतीने करण्यात आले आहे. तसेच डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस तथा राज्यस्तरीय ग्रंथमित्र श्री उल्हास देसाई यांनी ही आवाहन केले आहे.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स