ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कट्टा येथे मराठी राजभाषा व विज्ञान दिन साजरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कट्टा येथे मराठी राजभाषा व विज्ञान दिन साजरा.

प्रकाशन: 01 Mar 2022 01:34 AM
वाचन संख्या 33

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कट्टा (मालवण) येथील बॅ .नाथ पै सेवांगण व केंद्रशाळा कट्टा क्र.१ यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रशाळा कट्टा क्र. १ शाळेत मराठी राजभाषा व विज्ञान दिन साजरा करण्यात आला.

वेदांत म्हाडगुत याने विज्ञानाचे महत्व,तनिषा म्हाडगुत हिने कविता वाचन, श्लोक चांदरकर याने कथाकथन, निखिलेश मेस्त्री, देवांग बांदेकर, अथर्व मेस्त्री, आराध्या मेस्त्री हिने विज्ञाननिष्ठ लेखांचे वाचन केले.

शिवण विभागाच्या विद्यार्थिनी प्रतिक्षा हिर्लेकर, प्रिया नांदोसकर, मंगल गावडे, सौ मालवदे यानी कविता वाचन केले.
मुख्याध्यापक ठाकूर यानी विज्ञान कविता सादर केली.
शिक्षका संपदा भाट हिने मराठी गौरव गीत गायन केले.
खिल्लारे गुरुजीनी विध्यार्थ्यांना कडून सामुदायिक कविता वाचन केले.


दीपक भोगटे यानी उपस्थित सर्व माजी विद्यार्थी असून २माजी विद्यार्थी किशोर शिरोडकर व रमेश म्हाडगुत राज्यस्तरीय शिष्यवृत्तीधारक असल्याचा उल्लेख केला.
सुजाता पावसकर हिने मराठी दिन व विज्ञान दिन याचे महत्व विशद केला.
विद्यार्थ्यांना ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक भेट देण्यात आले.
प्रारंभी मराठी गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
या वेळी किशोर शिरोडकर, रमेश म्हाडगुत, दीपक भोगटे, गणेश वाईरकर, सुजाता पावसकर, ठाकूर गुरुजी, खिल्लारे गुरुजी, संपदा भाट, श्रीधर गोंधळी, शिवण विभागाच्या विद्यार्थिनी पालक विद्यार्थी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स