ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
वडाचापाट सोसायटी अध्यक्षपदी राजेंद्र प्रभुदेसाई यांची निवड!

वडाचापाट सोसायटी अध्यक्षपदी राजेंद्र प्रभुदेसाई यांची निवड!

प्रकाशन: 23 Feb 2022 10:44 PM
वाचन संख्या 148

भाजप पुरस्कृत पॅनलने सर्व १३ जागा मिळवत शिवसेनेचा उडवला होता धुव्वा.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण तालुक्यातील वडाचापाट विकास सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी राजेंद्र प्रभुदेसाई यांची तर उपाध्यक्षपदी प्रकाश चिरमुले यांची निवड झाली आहे.  सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी जास्तीतजास्त योजना राबविल्या जातील असे प्रतिपादन यावेळी अध्यक्ष राजेंद्र प्रभुदेसाई यांनी केले. 
मागील महिन्यात  झालेल्या पंचवार्षीक निवडणुकित भाजप पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलने  सर्व जागांवर विजय मिळवीत शिवसेना पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा उडविला होता.  या निवडणुकीत १३ पैकी १३ जागांवर भाजप पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलने विजय मिळविला होता.

भाजप पुरस्कृत पॅनलचे प्रमुख आणि मालवणचे माजी सभापतीं राजेंद्र प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पुरस्कुत शेतकरी सहकार पॅनलने आपला विजय प्राप्त केला होता. या शेतकरी सहकारी पॅनलचे  उमेदवार राजेंद्र प्रभुदेसाई, एकनाथ पाटकर, महेंद्र हडकर, अभिमन्यु पालव, बाबुराव चिरमुले, प्रकाश चिरमुले, नामदेव वरक, स्मिता पालव, भानुदय कासले, श्रीनिवास हडकर, विजय घाडिगावकर, आंनदि पाटकर, विद्याधर तातोबा पाटकर यांनी विजय मिळवत शिवसेना पुरस्कुत पॅनलचा एकतर्फी पराभव केला. 

 या निवडणुकिसाठी भाजपच्या पॅनलला भाजप नेते दत्ता सामंत, अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, अनिल कांदळकर, गोळवण सरपंच सुभाष लाड, साबाजी गावडे, सोमनाथ पानवलकर, रिता वायगंणकर, शरद मांजरेकर, विरेश पवार, बिजेंद्र गावडे, आप्पा घाडीगावकर यांनी सहकार्य केले होते.

निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर, सचिन पाताडे, प्रवीण पाताडे, वैभव पालव, सचिन हडकर, समीर मुंबरकर, श्रीकांत पाटकर, रामचंद्र कासले, दीपक मांजरेकर, दया देसाई आदी ग्रामस्थ उपस्थित होते.अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राजेंद्र देसाई यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स