पळसंब ग्रामपंचायतीतर्फे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना विशेष निवेदन…!
पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचा कृषी पर्यटन विकासासाठी पाठपुरावा..
चिंदर | विवेक परब : पर्यटन मंत्री नाम.श्री.आदित्य ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौर्यात मालवण तालुक्यातील पळसंब गांवच्या ग्रामपंचायतीद्वारा गांवच्या पर्यटन विकासासाठी विशेष निवेदन दिले गेले.
पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी दिलेल्या या निवेदनात पळसंब गांव हे कृषी तथा शेतीपर्यटनासाठी विकसीत केले जावे तसेच पर्यटन विकासाच्या विविध योजना राबविण्यासाठी गावातील श्री जयंतीदेवी मंदिराचा परिसर विकसीत करण्यासाठी त्याचा पर्यटनासाठी विकास आराखड्यात समावेश केला जावा या प्रमुख मुद्द्यांची मागणी केली गेली आहे.
पर्यटन मंत्री श्री आदित्य ठाकरे या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करुन लवकरात लवकर या निवेदनाची उचित दखल घेऊन पळसंब गांवच्या पर्यटन विकासाला महाराष्ट्राच्या कृषी पर्यटन नकाशावर नेऊन विकासाला चालना देतील असा विश्वास पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी व्यक्त केला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)