ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चिवला बिच मार्गावर बांधकामाचा शुभारंभ.

चिवला बिच मार्गावर बांधकामाचा शुभारंभ.

प्रकाशन: 14 Feb 2022 08:04 PM
वाचन संख्या 108

माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली विकासकामे.

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी प्राधान्याने मंजूर केलेल्या शहर प्रगतीच्या टप्प्यातील कामे.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण शहरातील पर्यटनाचे मुख्य आकर्षण केंद्र असलेल्या मार्गांपैकी चिवला बिच मार्गावर वालावलकर उद्यान येथून पावसाळी पाणी निचरा होण्यासाठी मालवण नगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या आरसीसी चेंबर व क्रॉसिंग बांधकाम कामाचा शुभारंभ डॉ. राहुल पंतवालावलकर यांच्या हस्ते करण्यात आला.


माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे मंजूर झाली. त्यापैकी अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. अनेक कामे पुर्णत्वासही गेली आहेत.
एकूणच नागरिकांची मागणी लक्षात घेऊन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी शहरात अनेक विकासकामे प्राधान्याने मंजूर केली. वरील कामेही मंजूर होऊन ती पूर्णत्वास जात असल्याबाबत नागरिकांच्या वतीने माजी बांधकाम सभापती यतीन खोत व माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी शहर प्रमुख बाबी जोगी, महिला तालुका प्रमुख दीपा शिंदे,
उपशहर प्रमुख यशवंत गांवकर,भाई कासवकर,शांती तोंडवळकर,
बाळू नाटेकर,प्रसाद आडवणकर ,मनोज शिरोडकर,रुजाय फर्नांडिस,नरेश हुले,साक्षी मयेकर, संतोष सावंत, प्रमोद वायंगणकर,विजय केळुस्कर, किशोर मयेकर,काशिनाथ मांजरेकर ,
रुपेश कांबळी,उदय परब, दादा पाटकर,समीप केळुस्कर,आकाश वालावलकर,पार्थ परब, प्रसन्ना मयेकर, गणेश मयेकर असे नागरीक,शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स