ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या तालुका सचिव राजेशकुमार लब्दे, खजिनदार रितेश सावंत, निरीक्षक संदेश फाटक.
चिंदर | विवेक परब : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या मालवण तालुका नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून सचिवपदी राजेश कुमार लब्दे, खजिनदार रितेश सावंत, निरीक्षक संदेश फाटक ,जनसंपर्क अधिकारी महेश मयेकर, यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.चौधरी व महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर यांनी मालवण मालवण तालुका सचिव पदी राजेशकुमार लब्दे, खजिनदार रितेश चव्हाण, निरीक्षक संदेश फाटक, जनसंपर्क अधिकारी महेश मयेकर यांची निवड २६ जानेवारी २०२२ रोजी जाहीर केले.
सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय खानविलकर
यांनी नुतन जनसंपर्क अधिकारी यांचे विशेष अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)