<em>ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची मालवण तालुका कार्यकारिणी जाहीर.</em>
पळसंब गांवचे सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांच्याकडे संघटकपदाची धुरा..!
चिंदर | विवेक परब : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेची मालवण तालुका नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी श्री.सुधिर धुरी यांची तर सचिव म्हणून राजेशकुमार लब्दे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. ‘ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, मालवण’ संघटनेच्या तालुका नूतन कार्यकारिणीची निवड राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.चौधरी व महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर,जिल्हा यांनी मालवण तालुका कार्यकारणीची निवड २६ जानेवारी २०२२ रोजी जाहीर केली.
मालवण तालुका अध्यक्ष सुधिर धुरी,कार्याध्यक्ष सुभाष प्रभूखानोलकर, उपाध्यक्ष प्रमोद कांडरकर,उपाध्यक्ष दुर्गाप्रसाद तुळपुळे, उपाध्यक्ष सुरेश मापारी. सचिव-राजेशकुमार लब्दे,खजिनदार-रीतेश सावंत, महिला संघटक- संजना गावडे, जनसंपर्क अधिकारी महेश मयेकर, निरीक्षक संदेश फाटक, संघटक- पळसंब गांवचे सरपंच चंद्रकांत गोलतकर, सदस्य अर्जुन परब,अश्विनी परूळेकर कोचरेकर,मालवण तालुका कायदेविषयक सल्लागार ॲड. सुदर्शन गिरसागर अशी नवीन कार्यकारणी जाहीर केली गेली आहे.सदर कार्यकारणीचा कार्यकाल जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ पर्यंत असणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर,जिल्हा उपाध्यक्ष नंदन घोगळे, जिल्हा सचिव कीशोर नाचनोलकर,जिल्हा संघटक मंदार काणे,जिल्हा महिला संघटक मानषी परब, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय खानविलकर
यांनी नूतन कार्यकारीणी पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)