ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणच्या सृजनशील शिक्षिका सौ.ज्योती रविकिरण बुवा-तोरसकर यांना सेट परीक्षेत यशाचा दुहेरी मुकुट..!

मालवणच्या सृजनशील शिक्षिका सौ.ज्योती रविकिरण बुवा-तोरसकर यांना सेट परीक्षेत यशाचा दुहेरी मुकुट..!

प्रकाशन: 29 Jan 2022 11:36 AM
वाचन संख्या 322

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील अ.शि.दे .टोपीवाला हायस्कूल मध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून गेली दोन दशके सृनशिलतेने सेवाव्रत असलेल्या सौ.ज्योती रविकिरण बुवा-तोरसकर यांनी राज्यस्तरीय सहाय्यक प्राध्यापक पदासाठी झालेल्या(सेट)परीक्षेत, मराठी या विषयात यश मिळवले आहे. यापूर्वी झालेल्या सेट परीक्षेत इतिहास या विषयात त्यांना यश मिळाले होते. मराठी व इतिहास या दोन्ही विषयात यश मिळवणाऱ्या काही मोजक्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. सदर परीक्षा ही युजीसी व सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणे तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी घेतली जाते.ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या सदर परीक्षेसाठी गोवा तसेच महाराष्ट्र मधून ७९७७५ बसले होते त्यापैकी ५२९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ६.६४% एवढा लागला आहे. सदर परीक्षेत मराठी पाठोपाठ इतिहास या विषयात सौ.ज्योती रविकिरण बुवा-तोरसकर यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद असून. आपल्या स्पर्धा परीक्षेतील अनुभवाचा फायदा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सौ.ज्योती बुवा तोरसकर या नेहमीच ज्ञानवर्धक विचारधारा व प्रयत्नांसाठी टोपिवाला हायस्कूल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांत कार्यरत असतात. त्यांच्या या दुहेरी मुकुटाबद्दल त्यांची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स