ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सहायक अभियंता अमोल कुंभार यांना शेर्ले ग्रामस्थांनी घातला घेराव..!

सहायक अभियंता अमोल कुंभार यांना शेर्ले ग्रामस्थांनी घातला घेराव..!

प्रकाशन: 27 Jan 2022 10:47 PM
वाचन संख्या 51

बांदा-शेर्ले पुलाचे काम चुकिच्या पद्धतीने होत असल्याचे अभियंता अमोल कुंभार यांच्या आणले निदर्शनास

बांदा | राकेश परब : तेरेखोल नदीवरील बांदा-शेर्ले येथे सुरू असलेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत होत असलेले पुलाचे काम आराखड्याविना व चुकीच्या पध्दतीने सुरू आहे. पुलास आमचा विरोध नसून दोन्ही बाजूने अजुन एका पिलरची आवश्यकता असताना त्याठिकाणी भरावाचे काम सुरू आहे. याचा धोका बांदा, शेर्ले व इन्सुली गावांना बसून महापुरावेळी तिन्ही गावे पाण्याखाली जास्त प्रमाणात जाण्याची शक्यता ग्रामस्थांनी अभियंत्यांसमोर व्यक्त केली. तर सहाय्यक अभियंता अमोल कुंभार यांनी पाऊस फक्त चारच दिवस असतो असे सांगताच ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत अभियंत्यांना धारेवर धरले. ग्रामस्थांकडून येथील भौगोलिक परिस्थितीची माहिती न घेता कंपनीने काम सुरू केले. याचे परिणाम आम्हाला महापुराच्या स्वरूपात भोगावे लागणार असल्याचे सांगत बांदा, शेर्ले व इन्सुली ग्रामस्थांनी अभियंत्यासमोर रोष व्यक्त केला. तसेच सुरू असलेले नियोजनशून्य काम योग्य पध्दतीने करा असेही सांगितले.
मडुरा दशक्रोशीला बांदा बाजारपेठेशी जोडणाऱ्या तेरेखोल नदीवरील बांदा व शेर्ले पुलाच्या दोन्ही बाजूला पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह मोठा असतो त्यामुळे त्यावेळी महापुरासारखी परिस्थिती निर्माण होते. गतवर्षात अनेकवेळा महापुराचा फटका बांदा व इन्सुली, शेर्ले गावांना बसला. यात अनेकांना अद्यापही नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यात अशा कामांमुळे एक प्रकारे महापुराला आमंत्रणच देण्यासारखी परिस्थिती कंपनीने निर्माण केली आहे. सदर पुलाच्या आराखड्याची प्रत कंपनीने ग्रामपंचायतला सादर न करता चुकीच्या पध्दतीने काम सुरू केल्याचा आरोप शेर्ले सरपंच उदय धुरी यांनी केला.
सिंधुदुर्ग जिह्यात यंदा आठ महिने पाऊस पडला. त्यात अनेकवेळा महापूर आला. परंतु सहाय्यक अभियंता अमोल कुमार यांनी सिंधुदुर्गात ‘चारच दिवस पाऊस’ पावसाळ्यात या ठिकाणी मोठा पडतो असे सांगताच ग्रामस्थ आक्रमक झाले. चार दिवसांत किती पाऊस पडणार आणि किती नुकसान होणार हे तुम्ही सांगू शकता का असा सवाल हुसेन मकानदार यांनी केला. दरम्यान पुलाचे काम योग्य पध्दतीनेच होणार असून काम पूर्णत्वास येण्यास अजून दोन महिन्यांचा कालावधी जाईल अशी शक्यता अमोल कुमार यांनी वर्तवली. बांदा सरपंच अक्रम खान, ग्रा पं सदस्य बाळू सावंत, राजेश विरनोडकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष गुरू सावंत, शेर्ले तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्याम सावंत, तसेच तात्या पावसकर, राकेश केसरकर, विलास आळवे, दीपक गोवेकर, श्री.नेवगी, हुसेन मकानदार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स