सिंधुदिनांक..
२६ जानेवारी रोजी झालेल्या घटना.
१५६५: विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.
१६६२: लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया.
१८३७: मिचिगन हे अमेरिकेचे २६ वे राज्य बनले .
१८७६: मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली .
१९२४: रशियातील सेंट पीट्सबर्गचे लेनिनग्राड असे नामकरण करण्यात आले.
१९३३: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सूरुवात केली.
१९४२: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दन आयर्लंड येथे आगमन.
१९४९: भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.
१९५०: भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.
१९५०: एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६५: भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले.
१९७८: महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू.
१९९८: कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान.
२००१: गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे २०,००० लोक ठार झाले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)