ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आचर्याचे श्री.हरिहर ऊर्फ हरिकाका जोशी कालवश..!

आचर्याचे श्री.हरिहर ऊर्फ हरिकाका जोशी कालवश..!

प्रकाशन: 24 Jan 2022 09:36 PM
वाचन संख्या 93

एका धार्मिक सेवाव्रतस्थ पर्वाची अखेर झाल्याची परिसरांत शोकाकुल भावना….!

आचरा | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा,भंडारवाडी येथिल रहिवाशी श्री. हरिहर (हरिकाका)  शंकर जोशी वय 92 यांचे राहत्या घरी रविवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. हरिकाका  हे गेली कित्येक वर्षे पिरावाडी तसेच गाऊडवाडी, नागोची वाडी सहित संपूर्ण गावात चालत भिक्षुकी पौरोहित्य करत असत या भागातील ग्रामस्थांशी एक वेगळेच नाते निर्माण झाले होते. इनामदार  भोसले यांची अनेक वर्षे देवपूजा, नैवेद्य, घटस्थापना नवरात्र मध्ये ते पौरोहित्य करत असत. भंडारवाडी येथील श्री मंदार सरजोशी व श्री निलेश सरजोशी यांचे ते काका व श्री रामचंद्र उर्फ चंदू सरजोशी यांचे मानस बंधू होत. आचरा परिसरात हरिकाकाना मानणारा मोठा वर्ग होता. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स