ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
चिंदरच्या सडेवाडीतील नाथ गोसावी युवक मंडळाचे अनुदानासाठी सामाजिक भान..!

चिंदरच्या सडेवाडीतील नाथ गोसावी युवक मंडळाचे अनुदानासाठी सामाजिक भान..!

प्रकाशन: 23 Jan 2022 07:51 AM
वाचन संख्या 369

चिंदर | विवेक परब (विशेषवृत्त ): भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व टेसा टेप्स (इं) प्रा. लि. यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक २० शाळांतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ई-लर्निंग च्या माध्यमातून शिक्षणाचा लाभ घेता यावा या करिता ४३ इंच स्मार्ट एल. ई. डी. टि. वी. वितरीत करण्याचे आयोजित करण्यात आले. टि.वी. ची एकंदरीत किंमत रु. २६४००/- इतकी होती. चिंदर ,सडेवाडी येथील नाथ गोसावी युवक मंडळाच्या वतीने “ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय , वायंगणी” शाळेची सदर अनुदाना करीता निवड होण्या करिता प्रयत्न करण्यात आला. त्या प्रयत्नांना यश येऊन शाळेची अनुदानासाठी निवडही केली गेली.
भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या नियमावली नुसार अंदाजे २०% म्हणजे रु. ५०००/- एवढी रक्कम शाळांनी जमा करावयाची होती व उर्वरित रक्कम भगिरथ संस्था व टेसा टेप्स (इं)प्रा.लि. कंपनी मार्फत भरून टि.वी. प्रदान करण्यात येणार होता.
ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी शाळेची रक्कम रु. ५०००/- ही आपल्या नाथ गोसावी युवक मंडळ चिंदर सडेवाडी यांच्या वतीने अदा करण्यात आली व सदर शाळेस स्मार्ट टि.वी. अनुदानित करण्यात आला.
नाथ गोसावी युवक मंडळाचे अध्यक्ष श्री. योगेश गोसावी व सचिव श्री. मंगेश गोसावी यांनी शाळेची व मुख्याध्यापक शिक्षकांची भेट घेऊन टि. व्ही.संचाची पहाणी करून त्याचा लाभ शिक्षणासाठी सर्व विद्यार्थ्यांना व्हावा अशी इच्छा व्यक्त केली.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. टकले सर यांनी नाथ गोसावी युवक मंडळ चिंदर सडेवाडी आणि भगिरथ प्रतिष्ठान व टेसा टेप्स यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली व नाथ गोसावी युवक मंडळाला आभार प्रदर्शनाचे पत्र दिले.
सर्वांना सोबत घेऊन सामाजिक विकास साधण्याची नाथ गोसावी युवक मंडळ ,सडेवाडी चिंदरची क्रियाशील परंपरा त्यांच्या शैक्षणिक योगदानातूनही सुरु राहील्याने या युवक मंडळाची प्रशंसा होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स