वेंगुर्ले तालुक्यातील भाजपा च्या शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक संपन्न.
चिंदर / विवेक परब : वेंगुर्ले तालुक्यातील शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी ” मन की बात ” अभियानाचे संयोजक बाबली वायंगणकर, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर मान्यवर म्हणून उपस्थित होते.
यावेळी शक्ती केंद्र निहाय बुथचा आढावा घेण्यात आला.तसेच ३० जानेवारी रोजी होणारया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ” मन की बात ” कार्यक्रम प्रत्येक बुथ वर किमान एक ठिकाणी दाखविण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात बुथ सदस्यांबरोबर नागरिकांनाही सामावून घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.तसेच राष्ट्रीय कार्यकारणी स्तरावरुन नमो ॲप समर्पण ( मायक्रो डोनेशन ) अभियान सुरु करण्यात आले आहे, त्या अनुषंगाने प्रत्येक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता तसेच भाजपा हितचिंतक यांनी पार्टी फंड म्हणून किमान ५ रु.ते कमाल १००० रु.मायक्रो डोनेशन च्या रुपाने नमो ॲप च्या माध्यमातून कशा प्रकारे करायचे आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रत्येक शक्ती केंद्रामध्ये कीमान २५ कार्यकर्त्यांनी समर्पण अभियानात सहभागी करून घेण्यासाठीचे नियोजन करण्यात आले.
यावेळी ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , प्रभारी ज्ञानेश्वर केळजी, रेडी शक्ती केंद्र प्रमुख जगंन्नाथ राणे, शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख विद्याधर धानजी, आरवली शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक, आसोली शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर, अणसुर शक्ती केंद्र प्रमुख गणेश गावडे ,उभादांडा शक्ती केंद्र प्रमुख निलेश मांजरेकर, मठ शक्ती केंद्र प्रमुख विजय बोवलेकर, वेतोरे शक्ती केंद्र प्रमुख सुधीर गावडे, परुळे शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे, म्हापण शक्ती केंद्र प्रमुख नाथा मडवळ व आनंद गावडे, शशी करंगुटकर इत्यादी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)