ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पेंडूर सोसायटी अध्यक्षपदी दीपा सावंत तर उपाध्यक्षपदी रमेश गावडे यांची बिनविरोध निवड; पेंडूर वि.का. सहकारी सेवा सोसा. लिमिटेड पेंडूरची निवडणूक.

पेंडूर सोसायटी अध्यक्षपदी दीपा सावंत तर उपाध्यक्षपदी रमेश गावडे यांची बिनविरोध निवड; पेंडूर वि.का. सहकारी सेवा सोसा. लिमिटेड पेंडूरची निवडणूक.

प्रकाशन: 14 Jan 2022 10:02 PM
वाचन संख्या 164

चौके दि. १४ ( अमोल गोसावी ): मालवण तालुक्यातील पेंडूर विकास सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गाव पॅनल च्या माध्यमातून बिनविरोध संचालक मंडळाची निवड काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. आज निवडणूक अधिकारी श्री मयेकर यांच्या माध्यमातून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष पदासाठी श्री. दिलीप उर्फ दिपा सावंत यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी श्री. रमेश गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी अन्य कोणाचाही अर्ज आला नसल्याने ही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.या संचालक मंडळामध्ये नव्याने निवडून आलेल्या श्री सत्यवान पाटील, श्री बापू वायंगणकर, श्री साबाजी सावंत, श्री शैलेश परब, श्री बिपिन परब, श्री नितीन राऊळ, श्री रामदास पेडणेकर, सौ प्रज्ञा बांदेकर, श्रीमती रेखा मोर्वेकर, श्री संतोष पेंडूरकर, श्री राजेंद्र पंदारे या संचालक मंडळाचे देखील उपस्थित ग्रामस्थ यांच्या माध्यमातून अभिनंदन करण्यात आले.यावेळी निवडणूक अधिकारी श्री मयेकर, संजय नाईक सर, शेखर फोंडेकर, रविंद्र गावडे, विनायक सावंत पटेल, संदेश नाईक, पपू राणे, संतोष घाडी, पिंटू परब, संदुर फोफळे, अमित सावंत, अशोक परब, कृष्णा पेंडूरकर, बाळा गावडे, संतोष पवार, रमेश म्हापणकर, सुमित सावंत, , सोसायटी कर्मचारी तळेकर,गणपत परब, वारंग तसेच गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स