सामाजिक कर्तव्याची जोपासना करत असलेली पत्रकारिता ही समाजाचा खऱ्या अर्थाने कणा बनली
केंद्रिय आयुषमंत्री श्रीपाद नाईक
बांदा | राकेश परब : सामाजिक कर्तव्यांची जोपासना करत येथे सुरू असलेली पत्रकारिता ही समाजाचा खऱ्या अर्थाने कणा बनली आहे. येथील पत्रकार हे नेहमीच सत्य मांडण्याचे धारीष्ठ दाखवितात, त्यामुळेच समाजाला या चौथ्या स्तंभाचा आधार वाटतो आहे.त्यामुळे भविष्यात देशाच्या विकासासाठी पत्रकारांनी आपल्या सकारात्मक लेखणीतून योगदान द्यावे असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी माडखोल येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने माडखोल येथील सावंत फार्म येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री नाईक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पद्मश्री परशुराम गंगावणे, माजी आमदार राजन तेली, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार राजाराम म्हात्रे, पोलीस निरीक्षक शंकर कोरे, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हाध्यक्ष उत्तम वाडकर,
यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते शेतीनिष्ट पुरस्कार प्राप्त प्रकाश वालावलकर,प्रेस क्लब भुषण विश्वनाथ नाईक,जय भोसले यांना तर कै.संदिप सावंत स्मृती पुरस्कार दिव्या वायंगणकर यांना प्रदान करण्यात आला तर पद्मश्री परशुराम गंगावणे यांना ह्या निमित्ताने विशेष गौरविण्यात आले.यावेळी मंत्री नाईक यांनी सिंधुदुर्ग पत्रकारितेचे विशेष असे कौतुक करतना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला धरून येथील पत्रकारिता सुरू आहे.मी जिल्ह्यात आल्यानंतर प्रत्येक वेळी माझा पत्रकारांशी संवाद होत असतो. त्यात त्याचा असलेला अभ्यास बघून मला नेहमीच अभिमान वाटत असतो सर्वानी एक ताकद निर्माण केली तर त्याचा विकास कामाला बळ मिळत असते सर्व सामान्य जनतेचे प्रश्न या निमित्ताने सुटत असतात असे मंत्री नाईक यांनी सांगितले. पद्मश्री गंगावणे यांनी आपली व्यथा माडतना शेतकर्यांना कायम आधार ठरलेल्या जिल्ह्यातील बारा बलुतेदारांचा उतरत्या वयात राज्य व केंद्र शासनाने मानधन सुरू करुन सन्मान करावा,अशी मागणी गंगावणे यांनी केली. कलाकारांना देण्यात येणारे मानधन हे तुटपुंजे आहे. त्यामुळे ती रक्कम वाढविण्यासाठी शासनाकडुन प्रयत्न व्हावेत, असे ही ते म्हणाले.तर राजन तेली यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेचे कौतुक करतना येथील पत्रकार हा खरोखरच अन्यायाला वाचा फोडणारा असल्याचे नमूद केले तर प्रांताधिकारी पानवेकर यांनी ही पत्रकार करत असलेले काम बघून मला अभिमान वाटतो आजही वृत्तपत्राचे महत्त्व हे टिकून असल्याचे सांगितले तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी आपण अनेक जिल्ह्यात नोकरी केली तेथील पत्रकारिता बघितली आणि सावंतवाडीतील पत्रकारिता बघतो खरोखरच वेगळेपण आहे न्यायासाठी येथील पत्रकार झटतात असे म्हात्रे म्हणाले.बबन साळगावकर यांनी ही सावंतवाडीतील पत्रकारिता विकासाला दिशादायक असल्याचे सांगितले.यावेळी पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलेयावेळी सावंतवाडीतील ज्येष्ठ पत्रकार उत्तम वाडकर,अभिमन्यू लोंढे यांना गौरविण्यात आले. तर पुरस्कार प्राप्त पत्रकार विजय देसाई,हरिश्चंद्र पवार व अमोल टेंबकर यांना सन्मान चिन्ह देण्यात आले.यावेळी माजी सभापती प्रमोद सावंत,साक्षी वंजारी,अन्नपूर्णा कोरगावकर, विभावरी सुकी,पुंडलिक दळवी,संजय शिरसाट,विश्राम सावंत उपस्थित होते तर प्रेस क्लब चे निलेश मोरजकर,राकेश परब, रूपेश हिराप संदेश पाटील,संदेश कारीवडेकर रणजित जाधव,प्रविण परब,बाळा सावंत विराज परब,नाथा कदम,शैलेश गवस,शैलेश मयेकर आदि उपस्थित होते. सुत्रसंचालन सौ.गौरवी पेडणेकर तर शेवटी आभार राकेश परब यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)