व्ही एन नाबर प्रशालेत टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा संपन्न
बांदा | राकेश परब : व्ही एन नाबर प्रशालेत टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा संपन्न श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मेडिअम स्कुल बांदा प्रशालेत बुधवार दिनांक ५ जानेवारी रोजी इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे ही स्पर्धा घेण्यात . या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
इयत्ता चौथी- प्रथम राशी तांडेल, व्दितीय खुशी गवस इयत्ता पाचवी प्रथम कुणाल परब व्दितीय शुभम शिरोडकर इयत्ता सहावी प्रथम मितेश मयेकर, व्दितीय प्रियांका वेंगुर्लेकर इयत्ता सातवी प्रथम श्रीशा सावंत इयत्ता आठवी प्रथम स्वामी शिरोडकर इयत्ता नववी श्रावणी गवस इयत्ता दहावी सेजल परब स्पर्धेचे परीक्षण प्रशालेच्या शिक्षिका सौ.हेलन राँड्रीग्स , श्रीम.रसिका वाटवे,सौ.दिक्षा नाईक यांनी केले.संस्थेचे अध्यक्ष श्री. मंगेश कामत,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई, सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)