ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मुणगे सोसायटी अध्यक्षपदी गोविंद सावंत यांची निवड!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मुणगे सोसायटी अध्यक्षपदी गोविंद सावंत यांची निवड!

प्रकाशन: 12 Jan 2022 10:17 PM
वाचन संख्या 189

उपाध्यक्षपदी संजय परुळेकर

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: मुणगे येथील श्री भगवती विविध कार्य. सह. सेवा सोसायटी अध्यक्षपदी श्री गोविंद सावंत तर उपाध्यक्षपदी संजय परुळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निबंधक पियुष जाधव यांनी काम पाहिले. सोसायटीच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य यापुढे राहणार आहे. शेतकरी हा घटक केंद्रबिंदू ठेवून जिल्हा बँकेच्या सहकार्याने शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातील शेतकऱ्यांना व्हावा यासाठी सकारात्मक प्रयत्न नेहमी राहतील. सोसायटीला स्वमालकीची इमारत असावी यासाठी प्राथमिक गोष्टींची पूर्तता चालू असून देवी भगवतीच्या आशीर्वादाने ही बाब सुद्धा पूर्णत्वास जाईल अशी ग्वाही यावेळी नूतन अध्यक्ष गोविंद सावंत यांनी उपस्थितांना दिली. यावेळी सचिव अस्मिता पेडणेकर, सदस्य धर्मजी आडकर, नंदकुमार बागवे, सत्यवान बागवे, यशवंत मुरकर, संजय परुळेकर, विजय पडवळ, प्रकाश सावंत, वासंती पुजारे, प्रभात सावंत, सुरेश बोरकर, विश्वास मुणगेकर आदी उपस्थित होते.सर्व सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. अध्यक्ष गोविंद सावंत, उपाध्यक्ष संजय परुळेकर यांचे अभिनंदन करण्यात आले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स