ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अक्कलकोट  येथील  श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर गाभाऱ्याच्या नूतनीकरणास प्रारंभ!

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर गाभाऱ्याच्या नूतनीकरणास प्रारंभ!

प्रकाशन: 06 Jan 2022 07:42 PM
वाचन संख्या 51

भाविकांनी मंदिर समीतीस सहकार्य करावे : अध्यक्ष महेश इंगळे

मसुरे| प्राजक्ता पेडणेकर : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या गर्भगृहाचा आतिल भाग व गाभारा मंडपाच्या परीसराचे नूतनीकरण करण्यात येत आहे. दुरुस्ती पुर्ण होई पर्यंत भाविकाना स्वामी दर्शनाची व्यवस्था वटवृक्ष मंदिरातीलच ज्योतीबा मंडपात करण्यात येणार असल्याची माहीती मंदिर समीतीचे चेअरमन महेश इंगळे यानी दिली आहे. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या परीसरात भाविकांच्या सोयी करता अनेक बदल करण्यात येत आहेत.

त्याच अनुषंगाने मंदिरातील श्री स्वामी समर्थांच्या मूळ गाभाऱ्यात मार्बल लावण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम पुर्ण होई पर्यंत येणाऱ्या स्वामी भक्ताना स्वामींचे दर्शन सुलभतेने व्हावे यासाठी ज्योतीबा मंडपात व्यवस्था करण्यात येणार आहे. मार्बल बसविण्याचे काम पुर्ण झाल्यावर गाभाऱ्यात श्रींची मुर्ती चांदीच्या सिंहासनावर बसविण्यात येणार आहे. मुर्तिचा पूनर्प्रतिष्ठापना सोहळा ऊडपी येथील विशेष पुरोहीतांच्या उपस्थितीत होणार आहे. भाविकानी सुद्धा सदर काम पुर्ण होई पर्यंत मंदिर समीतीच्या व्यवस्थेनुसार स्वामी दर्शन घेऊन मंदिर समीतीस सहकार्य करावे असे आवाहन महेश इंगळे यानी केले आहे.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स