ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कट्टा येथे वेशभूषा स्पर्धा!

कट्टा येथे वेशभूषा स्पर्धा!

प्रकाशन: 04 Jan 2022 05:20 PM
वाचन संख्या 74

बॅ . नाथ पै सेवांगण कट्टा शाखेचे आयोजन

२७ महिलांनी घेतला सहभाग

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: बॅ. नाथ पै सेवांगण कट्टायेथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्तवेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले, डॉक्टर, सिस्टर, दशावतारी सकला , रात्रीचा खेळ चालेचा पांडु , पी. व्ही. सिंधु, ज्योतिबा फुले, शेतकरी , बुरुड महिला आदी विविध भूमिका महिलानी सादर केल्या. मुलांचे संगोपन, आरोग्याची काळजी, आहार नियोजन, सायकलींगचे महत्व आदी विषयांचे डॉ. गार्गी ओरसकर यानी महिलाना मार्गदर्शन केले. नितीन वाळके यानी सावित्रीबाईंचे योगदान किती महत्वाचे आहे याची सविस्तर माहिती दिली व महिलानी कणखर बनावे असे सांगितले. लोकमान्य पतसंस्थेचे शाखाधिकारी आनंद प्रभुवालावलकर यानी महिलाचे कौतुक करून सेवांगणास नेहमीच सहकार्य असेल याची ग्वाही दिली.

प्रकाश चव्हाण यानी दिक्षीत आहाराचे महत्त्व सांगितले.

या स्पर्धेचे परीक्षण डॉ गार्गी ओरसकर, नितीन वाळके व वैष्णवी लाड यानी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैष्णवी लाड व सुजाता पावसकर यानी केले.नमिता नांदोसकर व समिक्षा हडकर यानी सावित्रीबाईची ओवी म्हटली. सहभागी सर्व महिलाना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास डॉ. गार्गी ओरसकर, नितीन वाळके, किशोर शिरोडकर , दीपक भोगटे , बापू तळावडेकर, सौ नागवेकर, सौ. भरणकर ,बापू तळावडेकर ,भास्कर आकेरकर , विकास वराडकर , चेतन मुसळे, वैष्णवी लाड, प्रकाश चव्हाण,व परिसरातील महिला उपस्थित होत्या.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स