ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मडूरेत मगरीचा बकरीवर प्राणघातक हल्ला

मडूरेत मगरीचा बकरीवर प्राणघातक हल्ला

प्रकाशन: 31 Dec 2021 09:57 AM
वाचन संख्या 47

बांदा / राकेश परब : मडूरा बाबरवाडी येथील जितवना भागातील माती नाला बंधाऱ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या बकर्‍यावर मगरीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज सायंकाळी घडली. या हल्ल्यात बकर्‍याच्या मानेवर गंभीर जखमा झाल्या आहेत. मालक केदू कानू शेळके यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवित मगरीवर दगडांचा वर्षाव केल्याने मगरीच्या तावडीतून बकरा बचावली.

मडूरे गावात मगरीने पाळीव जनावरांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आज केदू शेळके हे बकर्‍यांच्या कळपाला माती नाला बंधाऱ्यात पाणी पिण्यासाठी घेऊन गेले होते. अचानकपणे दबा धरुन बसलेल्या मगरीने बकर्‍यावर हल्ला चढविला. यावेळी केदू शेळके यांनी मगरीवर दगडांचा वर्षाव केला व आरडाओरड करताच मगर पाण्यात गेली.

याबाबत मडुरा उपसरपंच विजय वालावलकर यांनी वनविभागा विरोधात संताप व्यक्त केला आहे. मडुरा गावात ठिकठिकाणी मगरींचे वास्तव्य आहे. मगरींचा बंदोबस्त करण्याबाबत वनविभाग चालढकल करीत असल्याचा आरोप विजय वालावलकर यांनी केला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स