परबवाडा ग्रामपंचायत मार्फत ई-श्रम कार्ड मोफत नोंदणी व कार्ड वाटप करुन सुशासन दिन साजरा..!
वेगुंर्ले | विवेक परब : परबवाडा ग्रामपंचायत येथे मोफत ई- श्रम कार्ड नोंदणी व कार्ड वाटप शिबिर चे आयोजन करण्यात आले होते.
माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुशासन पर्व अंतर्गत ई-श्रम शिबिरात बांधकाम मजुर,रिक्षा ड्रायव्हर, मॅकॅनिक कामगार, मोलकरीण,असे अनेक असंघटित कामगार लोकांचे ई श्रम कार्ड नोंदणी करण्यात आली.
असे कामगार आहे ज्यांची शासनाकडे नोंद नाही. काही आपत्ती आली असता. किंवा काही नुकसान झाले असता त्यांच्यासाठी शासन काहीही करू शकत नाही म्हणून केंद्र शासन या नोंदणीच्या माध्यमातून अशा लोकांना एक UAN विशिष्ट नंबर देणार आहे. आणि त्याचे इ श्रम कार्ड आधार कार्ड सारखे कार्ड आहे ज्यामुळे त्या लोकांना एक ओळख मिळणार असून शासनाचे अनेक लाभ मिळण्यास सोपे होणार आहेत.
या कार्याक्रमा निमित़्त महाराष्ट प्रदेश सदस्य श्री. शरदजी चव्हाण,जिल्हा सरचिटणिस श्री.प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष श्री.सुहास गंवडळकर,मच्छिमार सेल जिल्हा अध्यक्ष श्री.दादा केळूसकर ता.सरचिटणीस श्री.प्रशांत खानोलकर,ता.उपाध्यक्ष श्री.मनवेल फर्नांडिस अल्पसंख्याक ता. अध्यक्ष श्री.सायमन आल्मेडा,म.मो.जि.सरचिटणिस साै.सारीका काळसेकर,ता.का.सदस्य सौ.अंकिता देसाई,परबवाडा सरपंच श्री.पप्पू परब,उपसरपंच श्री.संतोष सावंत.ग्रामपंचायत सदस्य श्री.संजय मळगांवकर,श्री.हेमंत गावडे,सौ.कृतिका साटेलकर,सौ.अर्चना परब,सौ.ग्लॅनेस फर्नांडिस,कु.सखी पवार आणि लाभार्थी श्री.सिध्देश कापडोसकर,सौ. प्रियांका किनळेकर श्री.जगदिश परब,श्री.बाळा परब,श्री.राजन अणसुरकर,श्री.नितीन पवार,सौ.आरती तेरेखोलकर,सौ.समिक्षा मळगांवकर,सौ.रुची भोवर,कु.अस्मिता बांदेकर यांच्या उपस्थित संपन्न झाला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)