खुल्या चित्रकला स्पर्धेत विष्णु, विठ्ठल,अश्विन अव्वल
वेताळ प्रतिष्ठानचे सुशासन दिनाच्या निमित्ताने आयोजन
ब्यूरो न्यूज/ विवेक परब : अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी याच्या जयंतीनिमित्त सुशासन दिनाच्याऔचित्याने आयोजित सलग ८ व्या वर्षी खुल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील भावी चित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, सुमारे २५० पेक्षा जास्त मुलांनी या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग घेतला . रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन सरपंच शंकर घारे व भाजपा जिल्हासरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गणेशपूजन व अटलजींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जैत्तिराश्रित संस्था मुंबई चे अध्यक्ष अँड.प्रभानंद सावंत,उपाध्यक्ष विष्णू परब,कार्यवाह बन्सी चव्हाण,ग्रा. प. सदस्य जयवंत तुळसकर, सदस्या शितल नाईक,प्रतिष्ठान अध्यक्ष विवेक तिरोडकर , उपाध्यक्ष प्रदीप परुळकर, प्रा.सचिन परुळकर, निवृत्त पोलीस सुधीर चुडजी, शैलजा परुळकर,अँड.मनिष सातार्डेकर, संजय परब,जीजी सावंत,संदीप पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते भाजपा च्या वतीने प्रतिष्ठान ला अटल बिहारी वाजपेयी यांची प्रतिमा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी भेट दिली.वेताळ प्रतिष्ठान सलग आठ वर्षे जिल्ह्यातील कला, क्रीडा , सांस्कृतिक क्षेत्रातील नवोदितांना व्यासपीठ निर्माण करून देत असून त्यांच्या इतर सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन नेहमीच होत असते.असे गौरवोद्गार प्रसन्ना देसाई यांनी मनोगत व्यक्त करताना केले. सरपंच शंकर घारे यांनी अबाल वृध्दासाठी प्रतिष्ठान उपक्रम राबवत असल्याबद्दल कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.अँड. सावंत यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम गरजेचे आहेत असे प्रतिपादन केले. या स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे रंगभरण स्पर्धा (बालवाडी गट) प्रथम: दिशम ओंकार परब द्वितीय: स्वरूपा संदीप मराठे तृतीय: विहान अमोल शेलार रंगभरण स्पर्धा (गट पहिली ते दुसरी)प्रथम: मयुरेश महेश हवालदार ( जि. प.नेमळे न.१)द्वितीय: सानवी मंगेश चुडजी (जि. प.वेताळ विध्यामंदिर,तुळस)तृतीय: साही नरेंद्र नाईक (जि.प.परबवाडा न.०१) चित्रकला स्पर्धा (तिसरी ते चौथी) प्रथम: अश्विन अर्जुन सोनसुरकर (वाजराठ-पिंपळाचे भरड)द्वितीय: रामचंद्र अरुण मांजरेकर (जि. प. स्वामी विवेकानंद,तुळस)तृतीय: पायल अतुल नेरुरकर (एम.आर.देसाई, वेंगुर्ला)उत्तेजनार्थ: दर्श जयदीप राणे चित्रकला स्पर्धा (पाचवी ते सातवी)प्रथम: विठ्ठल प्रसाद कोरगावकर ( जि. प. वेंगुर्ला न ०१)द्वितीय: प्रिया प्रदिप देसाई (मिलाग्रीस,सावंतवाडी)तृतीय: उमेश संतोष मेस्त्री (जि. प.वजराठ न. ०१)चित्रकला स्पर्धा (आठवी ते दहावी)प्रथम: विष्णु उदय आरोलकर (दाभोली हायस्कूल) द्वितीय: पुर्वा रामदास चांदरकर (नेमळे हायस्कूल)तृतीय: दिशा राजन पालकर (अणसूर-पाल हायस्कूल) यानी पारितोषिक पटकाविले.
स्पर्धेचे परीक्षण कला शिक्षक अनिल परुळकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव गुरुदास तिरोडकर यांनी तर रोहन राऊळ यांनी आभार मानले, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महेश राऊळ,सद्गुरु सावंत,मंगेश सावंत,माधव तुळसकर, किरण राऊळ, सदाशिव सावंत,हेमलता राऊळ,हेमंत सोकटे , वैभवी सोकटे , सानिया वराडकर यांनी प्रयत्न केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)