ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदा येथील (कै.) सुधीर वराडकर यांच्या कुटुंबियांना बांदा भाजप पक्षातर्फे  आर्थिक मदत.

बांदा येथील (कै.) सुधीर वराडकर यांच्या कुटुंबियांना बांदा भाजप पक्षातर्फे आर्थिक मदत.

प्रकाशन: 26 Dec 2021 08:57 PM
वाचन संख्या 41

बांदा / राकेश परब : शहरातील गवळीटेम्ब येथील भाजपचे कट्टर कार्यकर्ते (कै.) सुधीर वराडकर यांच्या कुटुंबियांना बांदा भाजपच्या वतीने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली. काही दिवसांपूर्वी सुधीर यांचे आकस्मिक निधन झाले होते. बांदा भाजपने वराडकर कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आर्थिक स्वरूपात मदत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी बांदा शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला. दोन दिवसात मदत गोळा करण्यात आली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून वराडकर कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन मदत देण्यात आली. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस अतुल काळसेकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक, उपसभापती शीतल राऊळ, सरपंच अक्रम खान, माजी सरपंच मंदार कल्याणकर, अशोक सावंत, बाळा आकेरकर, दीपक सावंत, उद्योजक भाऊ वळंजू, महिला तालुकाध्यक्ष अपेक्षा नाईक, सुनील धामापूरकर, संदीप बांदेकर, ऋषिकेश देसाई आदी उपस्थित होते. वराडकर कुटुंबियांना यापुढेही मदतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी भाजपच्या वतीने देण्यात आले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स